सध्याचा काळ हा ऑनलाईन शिक्षणाचा आहे. घरच्या घरी राहून आपल्या सोयीनुसार प्रत्येकजण ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतो. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात येणासाठी प्रत्येकाला अतिशय कमी खर्चात हे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी स्मार्ट उद्योजक या स्वातंत्र्यदिनी एका नव्या उपक्रमाचा शुभारंभ करत आहे.

‘स्मार्ट उद्योजक अकादमी’ या वेबपोर्टलद्वारे स्मार्ट उद्योजक विविध विषयांवरील कोर्सेसची निर्मिती करणार आहे. मार्केटिंग, सेल्स, व्यक्तिमत्त्व विकास, वेळेचे नियोजक, बिझनेस मॅनेजमेंटविषयक विविध अभ्यासक्रम या वेबपोर्टलवर मोफत उपलब्ध असतील. यासाठी तुम्हाला फक्त ‘स्मार्ट उद्योजक अकादमी’ची मेम्बरशिप घेणे गरजेचे आहे.

पहिल्या टप्प्यात ही मेम्बरशिप फक्त स्मार्ट उद्योजकच्या आजीव वर्गणीदारांनाच देण्यात येत आहे. तुम्ही स्मार्ट उद्योजकचे आजीव वर्गणीदार असाल तर नोंदणी पेजवर जाऊन आपला मेम्बरशिप फॉर्म भरावा. आपला ई-मेल व मोबाइल नंबर व्हेरिफाय करून आपली मेम्बरशिप मंजूर केली जाईल. मेम्बरशिप मंजुरीनंतर आपण उपलब्ध कोणत्याही कोर्सला रजिस्टर होऊन तो पूर्ण करू शकता. (तुम्ही स्मार्ट उद्योजकचे आजीव वर्गणीदार अद्याप झाले नसाल, तर येथे क्लिक करून फक्त ₹१२३ मध्ये वर्गणीदार होऊ शकता.)

‘स्मार्ट उद्योजक अकादमी’च्या माध्यमातून लाखो उद्योजक घडवण्याचा आमचा संकल्प आहे. यासाठी तुमची साथ ही मोलाची आहे. ती आम्हाला मिळेलच याची खात्री आहे. धन्यवाद.

आपली स्नेहांकित,
टीम स्मार्ट उद्योजक

error: Content is protected !!